Raosaheb Danve Reaction: 'या' कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल, तेव्हा भाष्य करू - रावसाहेब दानवे - समान नागरी कायदा
जालना: देशातील 4 राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले. ज्यावेळी या कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल, त्यावेळी यावर भाष्य केले जाईल असे दानवे यांनी म्हटले आहे. ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते. उद्या देशाच्या नवीन संसदेचे उदघाटन होणार आहे. या सभागृहाचा प्रत्येकाने मान राखला पाहिजे. नवीन संसदेच्या उद्घाटनाला विरोध करणे विरोधकांना शोभत नाही. पण विरोधक नवीन कुठला तरी मुद्दा काढून त्यावर चर्चा घडवून आणतात, असा टोलाही दानवे यांनी विरोधकांना मारला आहे. तर संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. भविष्यात होणाऱ्या राजकीय विस्ताराचा विचार करुन या नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. पण या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद सध्या चांगलाच रंगला आहे.