Raosaheb Danve On Congress : आमची दिवाळी लवकरच, काँग्रेसवर टीका करताना रावसाहेब दानवेंचा सूचक दावा - काँग्रेस आमदार
जालना :आमची दिवाळी जवळ आलीय त्यामुळे मला लवकरात लवकर जिल्ह्यातील विकासकामांचे उद्घाटने करायची आहेत. आमच्या सत्तेत उलथापालथ झाली तर कैलास गोरंटयाल उद्या उदघाटनाला बोलावतील की नाही हे सांगता येत नसल्याची खोचक टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. मात्र रावसाहेब दानवे यांनी आमचे सरकार सत्तेत येईल का नाही, याबाबत वक्तव्य केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
यदाकदाचित केंद्रातील भाजपची सत्ता पालटली तर काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल हे आज जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे माझे कौतुक करतात. मात्र सत्ता गेली तर ते पुन्हा उद्या असेच बोलतील की नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांना मारला. आज जालन्यात लोकोमोटीव्ह कामाचे रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले, त्यावेळी त्यांनी हे विधान केले. केंद्रातील आमच्या सत्तेत उलथापालथ झाली तर कैलास गोरंटयाल उद्या विकासकामांच्या उदघाटनाला आम्हाला बोलवतील की नाही अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.