Rana couple राणा दाम्पत्यांनी अमरावतीत केले हनुमान चालीसा पठण - अमरावतीत केले हनुमान चालीसा पठण
अमरावती श्री संत बालयोगी गजानन बाबा यांच्या 62 व्या जन्मोत्सवानिमित्त अमरावती शहरातील कल्याण नगर येथील प्रांगणात हरिद्वार येथील परमपूज्य स्वामी चिन्मयानंद बापू यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्याच दिवशी या सोहळ्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी 11 वेळा हनुमान चालीसा पठण केले. या सोहळ्याला स्वामी चिन्मयानंद बापूजी यांच्यासह देवनाथ मठाचे मठाधिपती जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST