VIDEO : नागालँडप्रमाणे मोदी सरकारलाही शरद पवारांनी पाठिंबा द्यावा - रामदास आठवले - रामदास आठवले मराठवाडा दौऱ्यावर
बीड :सध्या रामदास आठवले मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये रामदास आठवले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळेस माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी नागालँडमध्ये झालेल्या निवडणुका आणि त्यात मिळालेल्या विजयावर भाष्य केले. आम्ही जसा नागालँडमध्ये करिष्मा केला. तसाच येणाऱ्या राज्यसभा विधानसभांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शरद पवारांनी ज्या पद्धतीने नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने नागालँड सरकारला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे मोदी सरकारला ही शरद पवारांनी पाठिंबा देऊन एनडीएमध्ये यावे असे आवाहन रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी बीडमध्ये केले. शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. याचा फायदा एनडीएला होईल. त्यामुळे शरद पवार यांनी एनडीएत यावे असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.