VIDEO : रामदास आठवले यांनी ईश्वर धुळेंना सुरीनेच भरविला वाढदिवसाचा केक - रामदास आठवले चाकूने केक भरवला
पालघर - वसईत आरपीआयचे वसई जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे यांचा वाढदिवस बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. सर्व काही सुरळीत होते. मात्र धुळे यांनी कापलेला केक जेव्हा आठवले यांनी हाताने न भरावता तो धुळे यांच्या तोंडात सुरीनेच भरविला. या सेलिब्रेशने उपस्थित नागरिकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळाल्या. केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री रामदास आठवले हे आरपीआय कार्यकर्ता मेळाव्यासाठी आज वसईत आले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST