महाराष्ट्र

maharashtra

Rama Navami Celebrations Sai Temple

ETV Bharat / videos

Rama Navami Celebrations Sai Temple : साई मंदिरात दहीहंडी फोडून रामनवमीची सांगता

By

Published : Mar 31, 2023, 5:10 PM IST

शिर्डी : शिर्डीच्या साईमंदिरात काल्याच्या कीर्तनानंतर दहिहांडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता करण्यात आली. तीन दिवस शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येतो. काल रात्री साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुल असल्याने काकड आरती करण्यात आली नाही. रामनवमी उत्सवाचा सांगता दिवस असल्याने सकाळी साईमूर्ती समाधीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईबाबा संस्थान समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिध्‍दाराम सालीमठ, त्‍यांच्या पत्‍नी मिनाक्षी सालीमठ यांच्‍याहस्‍ते गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला. तसेच साईसमाधी मंदिरात संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, त्‍यांची पत्‍नी कावेरी जाधव यांनी सहपरिवार साईबाबांची पाद्यपूजा केली. रामनवमी उत्सवाचा सांगता दिवस असल्याने साईमंदिरात कीर्तन पार पडले. काल्याच्या कीर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, साईभक्त उपस्थित होते. झिम्मा, फुगडी खेळून भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. या तीन दिवसात ५ लाख भाविक साईचरणी नतमस्तक झालेत.

साई मंदिरात विद्युत रोषणाई :दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून शेकडो पायी पालखीसह साईभक्तांनी शिर्डीत प्रवेश केला. तसेच राज्यभरातून येणाऱ्या साई भक्तांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी आज्ञापत्रे उभारण्यात आली असून साई मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त अमेरिकेतील परोपकारी साई भक्त श्रीमती शोभा पै यांनी दान केलेल्या समाधी मंदिर व परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. मुंबईतील द्वारकामाई मंडळाच्या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून प्रवेशद्वारावर काल्पनिक भव्य देखावा उभारण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details