राम मंदिर लोकार्पण दिवशी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा - महंत अनिकेतशास्त्री - राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा
Published : Dec 8, 2023, 9:00 PM IST
|Updated : Dec 8, 2023, 9:07 PM IST
नाशिक Ram Temple Inauguration : 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे भव्य राम मंदिर लोकार्पण सोहळा होत आहे. (Aniket Shastri On Ram Temple Inauguration) या सोहळ्याची सर्वांना अनुभूती घेता यावी यासाठी सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महंत पीठाधीश्वर डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे.
130 देशांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित :अयोध्येत भव्य राम मंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. या दिवशी मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील होणार आहेत. (Ram Mandir Ayodhya) प्राणप्रतिष्ठेपूर्वी एक आठवडा आधीपासूनच पूजा-अर्चा सुरू होणार आहे. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला 130 देशांचे प्रतिनिधी, साधू, महंत अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. राम मंदिराचं 22 जानेवारीला सकाळी उद्घाटन होणार आहे. मंदिर लोकार्पणाचा जवळपास सात दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. हा सोहळा झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी राम मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. (Dedication ceremony of Ram Mandir)
राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी:राज्य आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माण आणि लोकार्पण सोहळ्यानिमित्त सरकारने राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी. जेणेकरून या दिवशी सर्वांना या आलौकिक घटनेची अनुभूती घेता येईल असं येथील महंत पीठाधीश्वर डाॅ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी म्हटलं आहे.