महाराष्ट्र

maharashtra

अभिनेता सयाजी शिंदे

ETV Bharat / videos

Mumbai News : पर्यावरण प्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिला 'पर्यावरण वाचवा' चा नारा - Rally Organized by Mumbai Municipal Corporation

By

Published : Jul 15, 2023, 3:44 PM IST

Updated : Jul 15, 2023, 3:56 PM IST

मुंबई :महानगरपालिका प्रभाग कार्यालय आणि एकता मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या, "पर्यावरण वाचवा" रॅलीसाठी हजारो मुंबईकर भर पावसात रस्त्यावर उतरले. ही रॅली एकता मंचचे अध्यक्ष अजय कौल आणि प्रशांत काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. अंधेरी वर्सोवा परिसरातील हजारो नागरिक भर पावसात या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी शेकडो तृतीयपंथी नागरिकांनी देखील पर्यावरण वाचवाचा नारा दिला. या कार्यक्रमासाठी पर्यावरण प्रेमी आणि मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील उपस्थिती लावली होती. यावेळी सयाजी शिंदे म्हणाले की, माझ्यातील कलावंताचा खरा प्रवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सुरू झाला. कॉलेजमध्ये असताना नाईट वॉचमन म्हणून काम करायचो. त्यावेळी विद्रोही कविता मोठ्या प्रमाणात ऐकल्या जात होत्या. नामदेव ढसाळ आणि दया पवार यांच्या कविता मला ऐकवल्या. तेव्हा खूप झाडे असायची? म्हणून आम्ही सह्याद्री देवरायाच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात केली. औरंगाबादमध्ये सध्या ६७ जुन्या झाडांचे पुनर्रोपण सुरू आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगितेले.

Last Updated : Jul 15, 2023, 3:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details