Pune Chipko Andolan: नदी सुधार विरोधात पर्यावरण प्रेमींची रॅली; झाडाला चिटकून चिपको आंदोलन - Today chipko Movement
पुणे : नदी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आरएफडी हटाव, सदोष आरएफडी राबवणारांचे करायचे काय, झाडे लावा झाडे जगवा, आम्ही निसर्ग सेवक, यांसारख्या विविध घोषणा देत पर्यावरण प्रेमी यांच्याकडून नदी सुधार प्रकल्पाविरोधात रॅली काढण्यात आली. तसेच यावेळी पुण्यातील संभाजी बाग येथील झाडांना चिटकून चिपको आंदोलन करण्यात आले. पुण्यातील बालगंधर्व येथून ही रॅली काढण्यात आली. या रॅली रॅलीमध्ये भाजप वगळता विविध राजकीय पक्ष नेत्यांनी देखील सहभाग घेतला होता. पुण्यातील हजारोंच्या संख्येने पर्यावरण प्रेमी यामध्ये सहभागी झाले होते. तर जंगली महाराज रस्त्यावरील पादचारी मार्गाने ती नदीपात्र मार्गे खिल्लारे वस्ती रॅली काढण्यात आली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या नियोजित नदी सुधार प्रकल्पाला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. नदी सुधार प्रकल्पामुळे नदीपात्रातील अनेक झाडे तुटणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे, यामुळे पर्यावरण प्रेमींनी ही रॅली काढली आहे. तसेच आधी नदी स्वच्छ करा, नदीकाठची झाडे आणि जंगल वाचवा, नदीची रुंदी कमी करू नका, नद्या नैसर्गिकरीत्या प्रवाही हव्यात, हवामान बदलाच्या परिणामांची तरतूद करण्यात याव्या अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.