महाराष्ट्र

maharashtra

५४ फूट उंच आणि ३४ फूट रुंद आकाराची राखी

ETV Bharat / videos

Raksha Bandhan 2023 : विद्यार्थ्यांनी 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांना राखी केली समर्पित; पाहा व्हिडिओ - 57 by 34 Feet Rakhi

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 9:46 PM IST

नागपूर :ललिता पब्लिक स्कूलमध्ये भव्य राखी तयार करण्यात आलीये. ५४ फूट उंच आणि ३४ फूट रुंद आकाराची राखी विद्यार्थीनी तयार केलीये. घरात वापरातील विविध साहित्य गोळा करून विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही राखी इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करण्यात आली असून, ही भव्य राखी पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. विद्यार्थ्यांनी सुमारे आठवड्याच्या मेहनतीनंतर ही इको फ्रेंडली राखी तयार केलीये. त्यासाठी लागलेले प्रत्येक साहित्य विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच गोळा केलंय. त्यानंतर भव्य राखी बनवण्याचा उपक्रम पूर्ण केला. दरवर्षीच या शाळेत विद्यार्थ्यांच्या हातून एक मोठी राखी बनवून घेण्याचा उपक्रम राबवला जातो. यावर्षी नुकतच इस्रोच्या शास्त्रज्ञानी संपूर्ण देशाला गर्व होईल अशी किमया घडवून भारताची चंद्रयान तीन मोहीम यशस्वी केली. त्यामुळे यंदाची राखी इस्रोच्या शास्त्रज्ञांना समर्पित करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details