Rajni Satav मुद्द्याचे राजकारण आता गुद्द्यावर आले आहे, रजनी सातव - bharat jodo yatra in hingoli
हिंगोली आमच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षात वैचारिक मतभेद होते. परंतु अशी गळेकापू स्पर्धा नव्हती. आजचे राजकारण हे रसातळाला गेले आहे. मुद्द्या ऐवजी आता गुद्दे आणि पैशाची भाषा बोलली जात आहे, अशी खंत दिवंगत राजीव सातव Rajeev Satav यांच्या मातोश्री आणि माजी मंत्री रजनी सातव Rajni Satav यांनी व्यक्त केली. राहुल गांधी Rahul gandhi यांची भारत जोडो यात्रा Bharat jodo yatra शनिवारी हिंगोलीतील कळमनुरी येथे दाखल झाली आहे. bharat jodo yatra in hingoli. राहुल गांधी त्यांचे घनिष्ठ मित्र राजीव सातव यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रजनी सातव यांना ईटीव्हीशी संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST