केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
ETV Bharat / videos
Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलं श्री साईबाबा समाधीचं दर्शन, पहा व्हिडिओ - Shri Saibaba Samadhi
अहमदनगर (शिर्डी ) : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी आज साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतलं. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतलं. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई आणि गुरूस्थानचं दर्शन घेतलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (CM Eknath Shinde) महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं साईबाबा मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी साईबाबा समाधीचं दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली. श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवशंकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देत सन्मान केला. (Shri Saibaba Samadhi)