जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला उजळले ‘मातृतीर्थ’, पाहा व्हिडिओ - जिजाऊंचा राजवाडा
Published : Jan 12, 2024, 8:15 AM IST
बुलढाणा Rajmata Jijau Jayanti : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 11 जानेवारीला राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी जिजाऊंचा राजवाडा अक्षरशः उजळून निघाला होता. तसंच राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा फुलांनी सजवण्यात आला असून राजमाता जिजाऊंची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आलीय. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊंचे पूजन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करताना शेकडो महिला उपस्थित होत्या. यावर्षी हा 426 वा जिजाऊ जन्मोत्सव असल्यानं 426 मशालीची भव्य मशाल यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी महिलांनी जिजाऊ वंदना घेऊन 'जय जिजाऊ,जय शिवराय' अशा गगनभेदी घोषणा दिल्या. तसंच हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.