Toll Plaza Video तरुणाचा प्रताप, महिला टोल कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात, घटनेचा व्हिडिओ आला समोर - Toll Plaza Video
Toll Plaza Video राजगड बिओरा भोपाळ बायपासच्या कचनारिया टोल प्लाझावर Rajgarh Toll Plaza गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तरुणाचा महिला कर्मचाऱ्याशी टोलबाबत वाद झाला. टोलच्या वादातून बेधडक तरुणाने टोल घेणाऱ्या महिलेला चोप दिला आहे. यानंतर महिला कर्मचाऱ्यानेही तरुणाला चप्पलने मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सहकाऱ्यासोबत झालेल्या मारहाणीची घटना पाहताच दुसरी महिला कर्मचारी येथे पोहोचली आणि तिचा बचाव केला. या घटनेनंतर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सीसीटीव्ही व्हिडिओच्या cctv video viral आधारे आरोपीची ओळख पटली आहे. तरूणाच्या साथीदारांनी टोलनाकावरही गोंधळ घातला. महिला टोल कर्मचाऱ्याच्या तक्रारीनंतर भाजप नेत्याच्या कुटुंबीयांना बिओरा पोलिसांनी अटक केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST