महाराष्ट्र

maharashtra

Railway Services Disrupted

ETV Bharat / videos

Railway Services Disrupted : नर्मदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, रुळावर पाणी आल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत - Rise in water level of Narmada river

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 3:52 PM IST

नंदुरबारRailway Services Disrupted :गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. प्रामुख्याने तापी आणि नर्मदा नद्यांना पूर आला होता. नर्मदा तसंच तापी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे गुजरातकडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. बहुतांश गाड्या नंदुरबार स्थानकावर थांबतायत. गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेच्या भरूच रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळ पाणी आल्यानं रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळं गुजरातसह महाराष्ट्रात रेल्वे वाहतूकीला फटका बसलाय. त्यामुळं नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल झालेले दिसून आलयं. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळं अनेक रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. नर्मदा नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच रेल्वे  सुरू होईल अशी चिन्हे दिसत आहेत.  

ABOUT THE AUTHOR

...view details