Raghav Parineeti Wedding: पाहा, परिणीती राघवच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडिओ - राघव चड्ढा
Published : Sep 24, 2023, 4:11 PM IST
उदयपूरRaghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा आज लग्नगाठ बांधत आहेत. त्यांच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये पाहुणे मंडळी गायक नवराज हंसच्या गाण्यांवर थिरकत आहेत. ‘दिल चोरी साडा हो गया’ आणि ‘गुड नाला इश्क मिठा’ हे गाणे वाजत आहेत. या व्हिडीओमध्ये गायक नवराज हंस मंचावर सादरीकरण करत आहे. त्यांचा लग्न सोहळा उदयपूरच्या द लीला पॅलेसमध्ये पार पडणार आहे. पॅलेसला आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आलीय. पंजाबी रितीरिवाजानुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नसोहळ्याला बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहेत. 'नो फोन पॉलिसी'चा परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्यात अवलंब करण्यात आलाय. (Raghav Parineeti wedding sangit Function)