महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात व्यापाऱ्यांचा मोर्चा

ETV Bharat / videos

Pune Traders Silent March: कृषी उत्पन्न बाजार समितीतील फिश मार्केट विरोधात पुण्यात मूक मोर्चा, पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 7:07 PM IST

पुणेPune Traders Silent March :पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीनं, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर फिश मार्केट आणि पोल्ट्री मार्केट उभा करण्याच्या निर्णय घेतलाय. त्या संदर्भात परवानगी देण्यात ( fish market in apmc) आलीय. त्या विरोधात आता या भागातील व्यापारी, नागरfक आक्रमक झालेत. आमचा या मार्केटला आणि पोल्ट्रीला विरोध आहे, असं म्हणत पुण्यात व्यापाऱ्यांनी आज मूक मोर्चा काढलाय. या मूक मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी, महिला आण नागरिक सहभागी झालेले होते. या मूक मोर्चाला आणि या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मोठ्या प्रमाणात जैन समाज राहतोय. या भागात जर फिश मार्केट झालं तर त्याचा आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केलीय. येथे तुम्हाला फिश मार्केट, पोल्ट्री फार्म करण्याची आताच अशी काय आवश्यकता भासली, असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी विचारलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details