Old Pension Scheme: ससून मधील सर्व नर्स संपात सहभागी; तोंडी नव्हे तर लेखी आश्वासन द्यावे - Old Pension Scheme
पुणे : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातील महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्स असोसिएशनचे सर्वच नर्स हे या संपात सहभागी झाले आहेत. आज त्यांच्या माध्यमातून ससून रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले आहे. जो पर्यंत सरकार तोंडी नव्हे तर लेखी आश्वासन देत नाही, तो पर्यंत हा संप असाच सुरू राहणार असल्याचे आंदोलक नर्सनी सांगितली आहे.
न्याय मागत आहे भीक नाही: 2005 नंतर जे शासकीय सेवेत कर्मचारी आले आहेत. त्यांना पूर्व लक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी ही आमची मागणी आहे. ही मागणी शासनाने पूर्ण करावी कारण आम्ही 2005 पासून यासाठी लढा देत आहे. आम्ही न्याय मागत आहे भीक नाही. शासन जरी आत्ता म्हणत असेल की आम्ही चर्चा करू, तर आत्ता चर्चा नव्हे तर आम्हाला लेखी आश्वासन पाहिजे. मंत्र्यांना तसेच आमदारांना एक एक टर्म झाले तरी पेन्शन दिली जाते. मात्र आम्ही 40 - 40 वर्ष काम करून देखील आम्हाला पेन्शन मिळत नाही. आम्ही पुढे करणार काय म्हणून शासनाने आमच्या या मागणीचा विचार करावा असे देखील यावेळी या आंदोलन कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.
आरोग्य व्यवस्थेवर फटका: राज्यभरातील अनेक रुग्ण हे मोठ्या प्रमाणात ससून रुग्णालयात येत असतात.आजच्या नर्सच्या या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेवर फटका बसत आहे. यावर नर्स म्हटले की, आम्ही आमच्या न्याय हक्कसाठी एकत्र आलो आहे. आम्ही रुग्णाची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेणार आहे. अत्यावश्यक सेवेत आम्ही संपात सहभागी होऊन देखील काम करू असे देखील यावेळी या आंदोलक नर्सने म्हटले आहे. सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी पकडलेल्या या संपात ससून रुग्णालयातील शंभर टक्के सहभागी झाले. तसेच त्यांच्या वतीने ससून रुग्णालयातच आंदोलन करण्यात आले आहे.