Pune Police Arrested Terrorists : पुणे पोलीस अन् दहशतवाद्यांमध्ये अशी झाली झटापट, पाहा सीसीटीव्ही फुटेजमध्ये थरार - arrest CCTV footage viral
पुणे : पुणे पोलिसांकडून ज्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्याला पुणे पोलीस कॉन्स्टेबल बाला रफिक शेख याने पकडले असून त्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. दहशतवाद्यांना पकडत असतानाचा थरारक व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉन्स्टेबल बाला रफिक शेख याचे सर्वत्र कौतुक होत आहे. राजस्थानच्या जयपूर शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेला सुफा या दहशतवादी टोळीशी संबंधित असलेल्या दोघांना पुणे पोलिसांनी पकडले आहे. या दोन्ही मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना कोथरूडमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. 30 मार्च 2022 रोजी राजस्थान पोलिसांनी एका कारमधून स्फोटके घेऊन जाताना अल्तमस बशीर खा शेरानी याला पकडले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआए) ने या संदर्भात गुन्हा दाखल करुन अनेकांना अटक केली होती. मात्र तेव्हापासून युनूस साकी, इमरान आणि फिरोज पठाण हे तिघे फरार होते.