NCP Unique Agitation : माशांवरून पुण्यात का झाले आंदोलन? पाहा.... - चंपा पापलेट
पुणे - वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. जंगली महाराज रस्त्यावर मोदी महागाई बाजार पेठ भरवत आंदोलन करण्यात आले. पुस्तके, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू, मासळी विक्रीसाठी या बाजारात ठेवण्यात आले होते. या बाजारात राष्ट्रवादीकडून सर्वात महाग चंपा पापलेट मासा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोदी सरकारच्या वतीने अत्यावश्यक सेवेसह जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणत वाढ करण्यात आली आहे. या वाढीच्या निषेधार्थ आज आम्ही मोदी महागाई बाजार पेठ उभी केली असून मोदी सरकारचा या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहे, असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST