Pune Marketyard Closed : 'या' कारणामुळे पुण्यातील मार्केटयार्ड बंद, पाहा व्हिडिओ
पुणे : दररोज गर्दीच तसेच वर्दळ असलेल ठिकाण म्हणजे पुण्यातील मार्केटयार्ड. दरोरोज हजारो शेतकरी हे पुण्यातील मार्केटयार्डमध्ये येत असतात. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारवाई नंतर माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी, अडत्यांच्या विरोधात दाखल झालेला ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी आज एक दिवसीय मार्केटयार्ड बंद ठेवण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती येथे काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर लिंबू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग मनात धरून माजी प्रशासक, अधिकारी, कर्मचारी, अडत्यांच्या विरोधात बेकायदेशीर ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा रद्द व्हावा या मागणीसाठी आज एक दिवस मार्केटयार्ड बंद ठेवण्यात आले आहे. तसेच यावेळी व्यापाऱ्यांकडून गुन्हे मागे घेण्यासाठी सर्व संघटनांच्या वतीने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला निवेदन देखील देण्यात आल आहे. यावेळी मार्केट प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. बाजारातून लिंबू विक्रेते पूर्णपणे बंद केल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर याप्रकरणी अधिकारी, आडते यांच्यावर ॲट्रॉसिटी, विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहे. याच्याच निषेधार्थ आज मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले आहे.