Pune Ganeshotsav २०२३ : दगडूशेठ गणपतीच्या रांगोळीत यंदा 'येरे येरे पावसा' थीम; पाहा व्हिडिओ - Ganeshotsav 2023
Published : Sep 19, 2023, 10:47 AM IST
पुणे : Pune Ganeshotsav २०२३ : 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या लाडक्या गणरायाचं आगमन (Ganesh Chaturthi 2023) होतंय. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं ढोल- ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात येतंय. दहा दिवसांच्या या मंगलमय उत्सवासाठी पुण्यनगरी सज्ज झालीये. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती (Dagadusheth Ganpati Pune) ट्रस्टच्या वतीनं यंदा अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात (Rangoli Ganesh Festival 2023) आली आहे. शहरात सकाळपासूनच नागरिकांनी बाप्पाच्या आगमनासाठी मोठी गर्दी केली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर ईरा रांगोळी आर्ट्सच्या वतीनं यंदा 'येरे येरे पावसा' ही थीम घेत रांगोळी (Yere Yere Pausa Rangoli Theme) काढत बाप्पाला साकडं घालण्यात आलंय. राज्यात यंदा सरासरी पेक्षा 9 टक्के पाऊस कमी झाला आहे. राज्यावर दुष्काळाचं सावट असून रांगोळीच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाचं सावट दूर व्हावं असं साकडं घालण्यात आलंय.