Pune Crime: वाहनांची तोडफोड करणाऱ्या कोयता टोळीची पोलिसांनी काढली धिंड - Pune Crime
पुणे : मागच्या आठवड्यात पुण्यातील सहकार नगर येथील अरणेश्वर परिसरात दोन गटात हाणामारी झाली होती. या हाणामारीत या दोन्ही गटाकडून परिसरातील गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलिसांकडून जवळपास 36 जणांना अटक करण्यात आली होती. ज्या परिसरात या दोन्ही गटाकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्याच परिसरात कोयता टोळीची पोलिसांनी धिंड काढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा पुणे शहरात गाड्यांची तोडफोड तसेच कोयता गँग सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. दहशत निर्माण करणाऱ्या या टोळीला पोलिसांचा धाक राहावे म्हणून पोलिसांच्या वतीने आरोपीची धिंड काढण्यात आली. पुण्याबरोबर पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँग सक्रिय आहे. या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी याची मागणी नागरिकांकडून होत होती.