Pune Bandh राज्यपाल बेताल वक्तव्याप्रकरणी, पुणेकर रस्तावर, बंदला दिला जोरदार प्रतिसाद
पुणे pune राज्यपाल भगतसींग कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी केलेल्या वक्तव्या वरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. Pune Bandh Today जबाबदार पदावरील व्यक्ती तसेच लोकप्रतिनिधींकडून अशी वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे भावना दुखावल्याने पुणेकर रस्त्यावर उतरले होते.तसेच पुण्यातील गणेशमंडळांनीही पुणे बंदच्या आवाहनाला पाठिंबा दिला. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज बंद असून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले मार्केटयार्ड देखील बंद करण्यात आले. पुणे बंदमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच विविध राजकीय पक्षाला तसेच सामाजिक संघटना गणेश मंडळानी बंदला पाठिंबा दिला. तर सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत पुणे बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून पुणे बंदच्या मोर्च्याला सुरुवात झाली. यात भाजप वगळता सर्वच संघटना तसेच विविध गणेशमंडळे आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम संघटना सहभागी झाल्या आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST