महाराष्ट्र

maharashtra

नाट्य संमेलन : नाट्य दिंडीने दुमदुमलं पुणे, कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद

ETV Bharat / videos

नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी; पाहा व्हिडिओ - नाट्य संमेलन

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 1:03 PM IST

Updated : Jan 8, 2024, 2:33 PM IST

पुणे Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् रंगकर्मींच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी काढण्यात आली. नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेनं ही नाट्य दिंडी सजली होती.

असंख्य नाट्य कलावंत सहभागी :मोरया गोसावी मंदिरापासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलापर्यंत पोहचली. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

Last Updated : Jan 8, 2024, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details