146 खासदारांच्या निलंबनाविरोधात ठाण्यात निदर्शनं
Published : Dec 26, 2023, 8:19 PM IST
ठाणे :देशात हुकूमशाही उदयास येत असून 146 विरोधी खासदारांचं निलंबन करण्यात आलंय, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मार्जिया शानू पठाण यांनी केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज मुंब्रा येथे जोरदार निदर्शनं करण्यात आली. सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी 14 डिसेंबरला 13 खासदार, 18 डिसेंबरला 33, 19 डिसेंबरला 49 आणि 20 डिसेंबरला दोन खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्याचवेळी 14 डिसेंबरला राज्यसभेतून 1 आणि 18 डिसेंबरला 45 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. या निलंबनाविरोधात मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच निलंबित खासदारांचं निलंबन मागे घेण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.