महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sambhaji Bhide Controversial Statement भिडे गुरुजींच्या वक्तव्याचा कोल्हापूरच्या महिला पत्रकारांकडून निषेध.. - samhaji bhide Controversial statement in kolhapur

By

Published : Nov 5, 2022, 6:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

संभाजी भिडे यांनी महिला पत्रकारावर वादग्रस्त विधान केल्यामुळे ( Sambhaji Bhide Controversial Statement) ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आधी टिकली लाव मग प्रश्नाचे उत्तर देतो असे म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांचा कोल्हापुरातील प्रसार माध्यमातील महिला पत्रकारांनी आज दसरा चौक येथे निषेध केला. यावेळी टिकली लावणे हा प्रत्येक महिलेची वैयक्तिक गोष्ट आहे. त्यामुळे भिडे गुरुजींनी महिलांची माफी मागावी व विधान मागे घ्यावे, अशी मागणी महिला पत्रकारांनी केली. यावेळी आधी टिकली लाव मग मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतो असे म्हणणाऱ्या भिडे गुरुजींचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी सुनंदा मोरे ,शुभांगी तावरे, श्रद्धा जोगळेकर, अश्विनी खोंद्रे, सीमा पवार, दीक्षा घोरपडे, अर्पणा माने, अहिल्या परकाळे, कल्याणी अमनगी, अर्चना बनगे, क्षनिक्षा धनवडे आदी उपस्थित होत्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details