महाराष्ट्र

maharashtra

फिलीस्तीनच्या लोकांसाठी करण्यात आली प्रार्थना

ETV Bharat / videos

Protest Against Israel In Pune: इस्राईलच्या विरोधात पुण्यात एकवटले हजारो नागरिक; फिलीस्तीनच्या लोकांसाठी करण्यात आली प्रार्थना - फिलीस्तीनच्या नागरिकांसाठी प्रार्थना

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 10:35 PM IST

पुणे Protest Against Israel In Pune: सध्या जगात इस्राईल आणि हमास या दोघांच्यामध्ये युद्ध सुरू असून फिलीस्तीन येथे इस्रायली सैनिकांच्या वतीने निष्पाप लोकांचे बळी घेतले जात आहेत. (Prayer for the citizens of Palestine) या विरोधात आज पुण्यातील गोळीबार मैदानावर कूल जमाती तांजिम (Kool Jamati Tanjim) तर्फे फिलीस्तीनच्या निष्पाप नागरिकांवर होत असलेल्या हल्याचा निषेध आणि त्यांच्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांतर्फ प्रार्थना करण्यात आली. (Citizens of Pune against Israel) यावेळी मोठ्या संख्येने नागरिक हे सहभागी झाले होते. पुण्यातील ईदगाह मैदान म्हणजेच गोळीबार मैदान येथे फिलीस्तीनच्या निष्पाप नागरिकांवर होत असलेल्या हल्याचा निषेध आणि त्यांच्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांतर्फे खास प्रार्थना करण्यात आली. यात सुमारे हजारो नागरिकांनी भाग घेतला होता तसेच महिलांचाही सहभाग हा मोठ्या संख्येने होता. इस्राईलवर फिलीस्तीनच्या हमास दहशतवादी संघटनेने रॉकेटच्या सहाय्याने हल्या केल्यानंतर इस्राईलमधील हजारो नागरिकांचे प्राण गेले. यानंतर इस्राईलने प्रत्युत्तरादाखल फिलीस्तीनवर हल्ला चढविला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details