Prithviraj Chavan Interview : 'भारत' म्हणायचं की 'इंडिया'? काँग्रेसची काय भूमिका? जाणून घ्या पृथ्वीराज चव्हाणांकडून - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
Published : Sep 10, 2023, 8:06 AM IST
पुणे : देशातील जवळपास २८ विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारच्या विरोधात 'इंडिया' आघाडीची स्थापना केली. त्यानंतर सरकारनं जी २० परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत देशाचा 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला. त्यानंतर देशात आता 'इंडिया' की 'भारत' असा वाद सुरू झाला आहे. विरोधक यावरून सत्ताधारी मोदी सरकारवर टीका करतायेत. सरकार आत्ताच इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव का पुढं करतं आहे, असा सवाल विरोधकांनी केला आहे. एकूणच देशभरातील विरोधकांची इंडिया आघाडी, या आघाडीमधील घटक पक्षांची भूमिका, तसेच राज्यातील शिंदे - फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचा कारभार यावर जेष्ठ कॉंग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली. पहा ही विशेष मुलाखत..