महाराष्ट्र

maharashtra

शेतकऱ्यांशी खासदार प्रीतम मुंडेंनी साधला संवाद

ETV Bharat / videos

Pritam Munde: आत्महत्या करण्यास निघालेल्या शेतकऱ्यांशी खासदार प्रीतम मुंडेंनी साधला संवाद; सुरक्षारक्षकाने हटकताच प्रीतम मुंडेचा चढला पारा - unseasonal Rain

By

Published : Apr 10, 2023, 1:31 PM IST

बीड: सध्या जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजवला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान देखील झाले आहे. यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. प्रीतम मुंडे काही कारणास्तव मुंबईत असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे शेतकऱ्यांची सांत्वन्पर संवाद साधला. मात्र या दरम्यान प्रीतम मुंडे अचानक या फोन कॉल चालू असताना भडकल्याचे ऐकायला मिळाले. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाले आहे आणि त्यात प्रीतम मुंडे मुंबईतील एका दवाखान्यात होत्या. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत असलेले अनेक फोन खासदार प्रीतम मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले. मात्र तात्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकत नसल्याने प्रीतम मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नुकसानस्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यास सांगितला. यावेळेस त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी मोबाईवरून संवाद साधला. प्रीतम मुंडे वैद्यकीय कारणास्तव एका रुग्णालयात होत्या. नेटवर्कचा प्रचंड प्रॉब्लेम असल्याने कॉलमध्ये अडथळा येत होता. यासाठी प्रीतम मुंडे यांनी नेटवर्क मिळेल अशा एका ठिकाणी उभे राहून संवाद साधायचा प्रयत्न केला. त्याचवेळी  रुग्णालय प्रशासनाने त्यांना तिथे उभे राहण्यास परवानगी दिली नाही. मात्र यावेळेस प्रीतम मुंडे भडकल्या. अरे माझ्या जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत असताना बोलण्यासाठी कसली परवानगी आली आहे. त्या भडकल्याचे काही वेळ भ्रमणध्वनीवर ऐकायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details