Sadabhau Khot : 'भाजपचं लक्ष आमच्याकडे नाही, मात्र वेळ आल्यावर..', सदाभाऊ खोत यांचा फडणवीसांना इशारा - सदाभाऊ खोत भाजपवर
बुलढाणा - रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपविषयी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सरकारमध्ये सदाभाऊ खोत हे कृषी राज्यमंत्री होते. मात्र सध्याच्या शिंदे - फडणवीस सरकारमध्ये त्यांना कोणतेही मंत्रीपद नाही. यावर सदाभाऊ खोत यांना विचारले असते, भाजपला आता वाड्यावर जायची सवय आहे. त्यामुळे वाड्यावरील झगमगटामुळे आमची झोपडी त्यांना दिसत नसावी, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावल. आम्ही पहिल्या फळीतील मित्रपक्ष असून लाठ्या खायची वेळ आली तर सर्वात पुढे आम्ही असतो. मात्र आता सत्तेच्या झगमगटामुळे आमच्यासारख्या झोपडीतील लोकांकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष जात नाही. मात्र हळूहळू त्यांचं लक्ष आमच्या झोपडीकडे जाईल, असा सूचक इशारा देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी दिला.