Droupadi Murmu Shirdi Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले साई समाधीचे दर्शन, गाडीतून उतरून भाविकांची घेतली भेट
अहमदनगर ( शिर्डी ): राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आल्या होत्या. द्रौपदी मुर्मू यांनी आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानिमित्ताने शिर्डीला आणि साई मंदिराला छावणीचे स्वरुप आले होते. राज्यातून जवळपास 1500 पोलिस कर्मचारी याठिकाणी तैनात करण्यात आले होते. साई दर्शनानंतर राष्ट्रपतींचा ताफा साई मंदिरात परिसरातून बाहेर निघाल्यानंतर महामार्गावर राष्ट्रपतींची गाडी येताच, तिथे त्यांना बघण्यासाठी थांबलेल्या साईभक्तांनी मॅडम मॅडम आवाज दिला. यावेळी राष्ट्रपतींनी आपली गाडी थांबविण्यास सांगितली. त्या गाडीतून त्या खाली उतरल्या आणि उपस्थित साईभक्तांची भेट घेतली. इतकेच नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या शंभर मिटर पायी चालत गेल्या. यावेळी भाविकांनीही वंदे मातरमच्या घोषणा दिल्या.