महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

woman give birth to child in bus : पंजाबमध्ये बसमध्ये गर्भवती महिलेने दिला मुलीला जन्म, आरोग्य विभाग 'असे' आले धावून - birth to baby girl in bus

By

Published : May 28, 2022, 10:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

चंदीगड- जालंधरहून लुधियानाला जाणाऱ्या बसमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिल्याची घटना ( woman giving birth in bus ) समोर आली आहे. अश्विनी असे या महिलेचे नाव असून ती लुधियानाची राहणारी आहे. गर्भवती महिलेला चालत्या बसमध्ये प्रसूती वेदना सुरू ( pregnant woman give birth daughter in bus ) झाल्या होत्या. दरम्यान, फगवाडा बसस्थानकावर येताच महिलेने एका मुलीला जन्म दिला. याबाबत पीआरटीसी विभागाचे बस कंडक्टर आणि प्रभारी म्हणाले की, आरोग्य विभागाची एक महिलाही याच बसमध्ये प्रवास करत होती. तिच्या मदतीने महिलेची प्रसूती झाली. यानंतर महिला व तिच्या मुलाला १०८ रुग्णवाहिकेतून सिव्हिल हॉस्पिटल फगवाडा ( Civil Hospital Phagwara in 108 ambulance ) येथे नेण्यात आले. याबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर कमल किशोर ( Dr Kamal Kishore of Civil Hospital ) यांनी सांगितले की, महिला आणि मुलगी दोघांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. मुलगी व आई दोघेही पूर्णपणे बरे आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details