Chandrayaan 3 च्या यशासाठी बाबा केदारनाथचा जलाभिषेक, Watch Video - चंद्रयान ३ च्या यशासाठी प्रार्थना
Published : Aug 23, 2023, 5:11 PM IST
केदारनाथ (उत्तराखंड) : चंद्रयान 3 च्या यशासाठी देशभरात हवन - पूजन केले जात आहे. मध्यप्रदेशातील महाकाल असो की अयोध्येतील राममंदिर असो, सर्वत्र चंद्रयान ३ च्या यशासाठी प्रार्थना केली जात आहे. उत्तराखंडमधील केदारनाथमध्येही चंद्रयानासाठी प्रार्थना करण्यात आली. येथे चंद्रयान ३ च्या यशासाठी बाबा केदारनाथचा जलाभिषेक केला गेला. बद्री केदार मंदिर समितीचे अधिकारी व पुजारी या पूजेत सहभागी झाले होते. यासोबतच बद्रीनाथ धाम येथे भगवान बद्रीविशाल आणि जोशीमठ येथील नरसिंह मंदिरातही महाभिषेक करण्यात आला. येथे चंद्रयान यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना केली गेली. ओंकारेश्वर मंदिर उखीमठ येथे शिवशंकर लिंगाची पूजा करण्यात आली. तर हरिद्वारमध्ये योगगुरू बाबा रामदेव यांनी चंद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगसाठी यज्ञ केला.