Praveen Darekar: दिवा विझायच्या अगोदर फडफडतो, तशी उद्धव ठाकरे यांची अवस्था- प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर यांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
सोलापूर:विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर हे रविवारी रात्री उशिरा सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांना माहिती देताना दरेकर म्हणाले, उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. वज्रमुठ सभेबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ही वज्रमुठ सभा नव्हती तर सफेदझूट बोलण्याची स्पर्धा महाविकास आघाडीमध्ये लागली होती. या सभेत उद्धव ठाकरेंच वैफल्यग्रस्त वक्तव्य पाहायला मिळाले. जसा दिवा विजताना फडफड करतो शेवटची,आगपाखड करत असते, तशीच आगपाखड उद्धव ठाकरेंनी नागपूरच्या सभेत केली. सफेदझूट बोलण्याचा कार्यक्रम नागपुरात झाला असे प्रवीण दरेकर यांनी सांगत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. जेव्हा उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले त्यावेळी जनाब बाळासाहेब ठाकरे असे होर्डिंग लागले, त्यावेळी मूग गिळून गप्प का होता? अजान स्पर्धा घेतल्या त्यावेळी देखील ठाकरेंच हिंदुत्व गप्प होते.आता मात्र उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत.नाक्यावर जशी हमरीतुमरी चालते त्याप्रमाणे काहीही कारण काढायचे आणि एकतर्फी आगपाखड करायचे असे उद्धव ठाकरेंच सुरू आहे. सत्ता गेल्यावर माणस एवढी विचलित होत नाहीत, त्यामुळे उलट्या पायाची सरकार अशी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिले आहे. उलट आताचे सरकार हे सरळमार्गी चालत आहे. संवेदना असलेले सरकार आहे, तुम्ही उलट्या पायाचे होता, म्हणून तुम्हाला पायउतार व्हावे लागले, असे दरेकर म्हणाले.