महाराष्ट्र

maharashtra

देशवासीयांचा जल्लोष

ETV Bharat / videos

chandrayaan 3 celebration : चंद्रयान ३ च्या यशाने नांदेडमध्ये फटाक्यांची आतषबाजी; वैज्ञानिकांचे मानले आभार - Prataprao Patil Chikhalikar Reaction

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 10:55 PM IST

नांदेड :चंद्रयान ३ च्या यशानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचे वातावरण असून अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद उत्सव साजरा केला जात आहे. नांदेडमध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भारत माता की जय च्या जयघोषात ठेका धरत आनंद साजरा केला. यावेळी खासदार चिखलीकर यांनी देशाच्या वैज्ञानिकांचे आभार मानत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच हा देशवासीयांचा विजय आहे, देश नवीन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशी प्रतिक्रिया खासदार चिखलीकर यांनी दिली. यावेळी भारताचा ध्वज फडकावून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. याप्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी महानगर अध्यक्ष प्रविण साले, उत्तर विधानसभा प्रमुख मिलींद देशमुख, अ‍ॅड. दिलीप ठाकूर, विजय गंभीरे, अनिलसिंघ हजारी, कामाजी पाटील मरळकरकर, बाळासाहेब देशमुख, संदिप क-हाळे, संदिप पावडे, सुनिल भालेराव, ओम बंडेवारे, शांभवी साले, नंदू बेंद, शिवा नागरगोजे, विशाल भद्रे, महादेवी मठपती, लक्ष्मी गायकवाड, शततारका पांढरे, राहुल कदम, बालाजी गायकवाड, अविनाश पावडे, राहूल कदम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details