Pratap Patil News : भाजपा खासदार चिखलीकरांना करावा लागला मराठा रोषाचा सामना, बंदी असताना गावात गेल्यानं गाड्यांवर दगडफेक - प्रताप चिखलीकरांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक
Published : Oct 27, 2023, 1:09 PM IST
|Updated : Oct 27, 2023, 1:49 PM IST
नांदेड Pratap Patil News : नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागलाय. गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्यानं त्यांना विरोध करुन त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडण्यात आल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते. विशेष म्हणजे कालच समाज बांधवानी नेत्यांच्या गाव बंदीचा निर्णय घेतला होता. त्यामुळं गावात चिखलीकर आणि त्यांचे कार्यकर्ते येताच मराठा समाज बांधव जमा झाले. चिखलीकरांनी गावात प्रवेश केल्यानंतर समाज बांधवानी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत खासदार चिखलीकर यांचा विरोध केला. याच दरम्यान मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांवर दगडफेक केली. या सर्व घटनेनंतर आसपासच्या परिसरात तणावपूर्वक वातावरण पाहायला मिळालं. दरम्यान, मराठा आंदोलन आता तीव्र वळण घेत आहे. मनोज जरांगे-पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसलेत. त्यामुळं मराठा बांधव आरक्षणाबाबत एकजूट दाखवत गावोगावी राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यासाठी पुढं येताय.