महाराष्ट्र

maharashtra

प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडले

ETV Bharat / videos

Prashant Bamb Office Vandalized : मराठा आंदोलक आक्रमक: भाजपा आमदार प्रशांत बंब यांचं संपर्क कार्यालय फोडलं - प्रशांत बंब यांचे ऑफीस फोडले

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 5:02 PM IST

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) Prashant Bamb Office Vandalized : मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलक आक्रमक (Maratha Protestors Aggressive) झाले आहेत. गंगापूर खुलताबाद मतदार संघातील भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचं गंगापूर शहरातील संपर्क कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं (Prashant Bamb Office Vandalized) आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटलाय. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शांततेत चालू असलेल्या आंदोलनानं आता हिंसक वळण घेतलंय.  

सरकारच्या भूमिकेमुळे तरुणांच्या आत्महत्या : सरकार मराठा आरक्षणासंबंधी कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्यानं आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत; पण सरकारला त्याचं काही देणं-घेणं नाही असं वाटतंय. त्यामुळं आता येथून पुढं आमदार असो की मुख्यमंत्री प्रत्येकालाच मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. तसंच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मराठा समाजाचं आंदोलन अजून तीव्र होईल, असा इशारा मराठा आंदोलकांकडून देण्यात आलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details