Electric substation पाच दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित; शेतकरी आक्रमक - विद्युत पुरवठा बंद
बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया गावात असलेले विद्युत स्बस्टेशन Electric substation पाच दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह फळ बागेचे मोठे नुकसान Major damage to orchards including Rabi crops होत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्याच्या कार्यालयात घेराव घातला आहे. पाऊस चांगला होऊन देखील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. गेल्या दहा तारखेला या ठिकाणचे सबस्टेशन बंद करण्यात आलेला आहे. आमच्या तालुक्यात कोणतही सबस्टेशन बंद करण्यात आलेलं नाही, मात्र टाकळी या गावातील सब स्टेशन बंद करण्यात आला आहे शेतकऱ्यांचे या ठिकाणी फार हाल होत आहेत, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा कोणताही पीक हातात आलेले नाही, शेतकरी खूप संकटात आहे आणि त्यांनी दिवाळी केलेली नाही मायबाप सरकारला विनंती आहे की, वीज पंपाचे हे कनेक्शन कट करू नका आता कुठेतरी गहू हरभरा ज्वारीला पाणी देण्याची वेळ आहे, ते जर आले तर तुम्ही जगणार आहेत, तरच शहरातील लोकांना खायला मिळणार आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही वेटीस धरू नका अशी मायबाप सरकारला विनंती आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST