महाराष्ट्र

maharashtra

शरद पवार राजीनामा

ETV Bharat / videos

Sharad Pawar Resign : शरद पवारांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप; पाहा दिवसभरात काय घडले - maharashtra politics

By

Published : May 2, 2023, 10:40 PM IST

मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सकाळी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात मोठे नाव असलेले पवार गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. शरद पवार यांनी 1999 साली सोनिया गांधी यांच्या विदेश नागरिकत्वाच्या मुद्यावरून कॉंग्रेस पक्ष सोडला आणि स्वत:ची वेगळी चुल मांडली. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेसने देशभरात यश मिळवले. त्यांचा पक्ष कॉंग्रेससह आघाडी करून राज्यात सलग 15 वर्षे सत्तेत होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोगही शरद पवार यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. शिवसेना व कॉंग्रेससह राष्ट्रवादी पक्ष महाविकास आघाडीचा प्रमुख घटक आहे. निवृत्तीची घोषणा करताना शरद पवारांनी आपण पक्षाध्यक्ष म्हणून राजीनामा देत असलो तरी राजकारणात मात्र कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details