Video : मुंबईकडे रवाना होणाऱ्या दुष्काळी शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले.. - Chief Minister Eknath Shinde
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या 42 गावांना पाणी द्यावे,यासाठी दुष्काळी जत तालुक्यातील शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या भेटीला सांगलीतून रवाना होत आहे. तत्पूर्वी या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी यांना भेट देऊन निवेदन देण्याचे नियोजन होते. मात्र सांगलीत पोहचले असता,पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दुष्काळी शिष्टमंडळाला रोखले आणि केवळ पाच लोकांना परवानगी देणार, अशी भूमिका घेतली. त्यानंतर दुष्काळग्रस्तांनी याबाबतीत संताप व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांची भेटीवर बहिष्कार घालत भेट घेण्यावर बहिष्कार टाकला आहे. आणि थेट कृष्णा नदीचे पाणी घेऊन मुंबईकडे जाण्याची भूमिका घेतली. यावेळी संतप्त झालेल्या तुकाराम महाराज यांनी प्रशासनाबद्दल रोष व्यक्त करत आम्ही आतंकवादी नाही, पाण्यासाठी आम्ही आलो आहोत. आम्ही महाराष्ट्र मध्ये राहतो, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यानंतर संतप्त दुष्काळग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन अखेर प्रशासनाने सर्व दुष्काळग्रस्तांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट देण्याची परवानगी दिली. त्यानंतर जतवरून आलेल्या सर्व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन 42 गावातल्या पाण्याच्या परिस्थितीची व्यथा मांडली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST