महाराष्ट्र

maharashtra

नागपुरमध्ये ईद उत्साहात साजरी

ETV Bharat / videos

Eid al Adha 2023: नागपुरमध्ये ईदचा उत्साह; पोलिसांनी दिल्या मुस्लिम बांधवाना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा - Eid mass prayer in Nagpur

By

Published : Jun 29, 2023, 10:57 AM IST

नागपूर :आज सर्वत्र उत्साहात ईद साजरी करण्यात येत आहे. नागपुरमध्ये ईदचा उत्साह बघायला मिळत आहे. मुस्लिम बांधवांकडून सकाळी मशिदींमध्ये ईदच्या नमाजचे सामूहिक पठण करून ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अल्लाहचे नामस्मरण करून सुख, शांती लाभावी अशी दुआ मागण्यात आली. ईदच्या निमित्ताने पोलिसांनी देखील शहरात कडक बंदोबस्त लावला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः मोमीनपूर येथे जाऊन मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा देत त्यांच्याबरोबर ईद साजरी केली. आज आषाढी एकादशी देखील असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता नागपूर पोलिसांनी घेतलेली आहे. मात्र, दुसरीकडे दोन्ही समाजांनी अगदी शांततेत आपले सण साजरी करत सामाजिक एकोप्याचा संदेश दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details