Police Detained 19 People : भिवंडीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे, 14 वर्षीय मुलासह १९ जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात... - मेरी पाठशाळा आंदोलन
ठाणे भिवंडी Bhiwandi महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाळा आंदोलनात Meri Pathshala Movement पाकिस्तान झिंदाबादचे नारे raised slogans of Pakistan Zindabad देणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थांसह १९ जणांना पोलिसांकडून ताब्यात Police detained 19 people घेण्यात आले. भिवंडीत विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतुन काढून टाकले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे दाखले परस्पर पोस्टाने त्यांच्या घरी पाठवले होते. यामुळे त्याला विरोध करत गुरुवारपासून महापालिकेसमोर काही विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आंदोलन सुरु केले. मात्र आज आंदोलन सुरू असताना एका १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने 'पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा दिल्याने आंदोलन भरकटले. विशेष म्हणजे वेळेतच पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले असून; त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यामध्ये आयोजकांसह १४ पुरूष व ५ महिलांचा समावेश आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST