महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Dadar Shivaji Park Barricating : शिवाजी पार्कसाठी शिवसेना आक्रमक; मैदानाभोवती पोलिसांचा बंदोबस्त - शिवाजी पार्कवरील दसरा मेळाऴ्यासाठी शिवसेना आक्रमक

By

Published : Sep 20, 2022, 5:12 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

मुंबई : शिवसेनेला दादर येथील शिवाजी पार्क मैदान दसरा मेळाव्याला (Shiv Sena Dussehra Mela Shivaji Park) हवेच आहे. शिवसेनेने त्यासाठी आक्रमक (Shiv Sena Aggressive for Dussehra Mela on Shivaji Park) पवित्रा घेतला आहे; मात्र शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाची मागणी (Dussehra Mela Shinde Group Shivaji Park Demand) केली होती. नंतर शिंदे गटाने बीकेसी मैदानावर (Shinde Group Dussehra Mela BKC Maidan) दसरा मेळावा साजरा करणार असल्याचे घोषित केले; पण आता ठाकरे गटास पारंपरिक शिवसेनेचा दसरा मेळावा साजरा करण्यास शिवाजी पार्क मैदान मिळणार की नाही याकडे राजकीय लक्ष ( Shivaji Park for Shiv Sena or for Shinde Group) लागले आहे. मात्र, शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहता पोलिसांनी मैदानाभोवती कठाेर सुरक्षा व्यवस्था (Shivaji Park Police Security Arrangement) ठेवली असून सीआरपीएफचे पोलिस देखील गेल्या दोन दिवसांपासून तैनात करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बैरिकेट्स देखील शिवाजी पार्कच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवण्यात आले आहेत. शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कसबे यांनी शिवाजी पार्कची सुरक्षा वाढवणार असल्याचे सांगितले. (Dadar Shivaji Park Dussehra Mela)
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details