महाराष्ट्र

maharashtra

पोळा 2023

ETV Bharat / videos

Pola 2023: लंपी'चं संकट आल्यानं शेतकरी राजा हैराण, ऐन पोळ्याच्या दिवशी जनावरं दगावली - मराठवाड्यात लंपी रोग

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 10:40 PM IST

Updated : Sep 14, 2023, 10:46 PM IST

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) Pola 2023 : काही वर्षांपासून कोरोना महामारीमुळं प्रत्येक सोहळ्यावर निर्बंध आलेत. त्या परिस्थितीतून बाहेर येत असताना प्राण्यांमध्ये येणाऱ्या आजारांनी पुन्हा चिंता वाढवलीय. ऐन पोळ्याच्या दिवशीच लंपी आजारानं एक बैल आणि गाय दगावली असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ही शेतकऱ्यांसाठी मोठी दुर्दैवाची बाब मानली जातेय. अनेक ठिकाणी ऐन पोळ्याला आपले बैल आणि गायी गोठ्यात बांधून ठेवण्याची वेळ आलीय. वर्षभर आपल्या शेतामध्ये राब राब राबणाऱ्या सर्जा राजांची आज नटून थटून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. मात्र, याच दिवशी बालानगर आणि बिडकीन येथे 2 जनावरांवर आजारानं घाला घातला. त्यामुळं परिसरात भीतीचंं वातावरण पाहायला मिळालंय. मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळं शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलाय. त्यात लंम्पी रोगामुळं पोळा सण देखील शेतकऱ्यांना घरच्या घरी किंवा गोठ्यातच साजरा करावा लागतोय. (Lumpy diseases crisis) 

Last Updated : Sep 14, 2023, 10:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details