Ramdas Phutane Tribute to ND Mahanor: स्वतंत्र शैली असलेला एक कवी, गीतकार आपल्यातून निघून गेला- रामदास फुटाणे - ना धो महानोर यांना श्रद्धांजली
पुणे : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर ज्येष्ठ वात्रटिकाकर रामदास फुटाणे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, त्यांच्या अशा आकस्मित जाण्याने धक्का बसला आहे. मराठवाड्यातील बोली भाषेतील अनेक शब्द हे मराठी साहित्यात आले आहेत. ही त्यांनी दिलेली एक अनमोल देणगी आहे. स्वतंत्र शैली असलेला कवी, गीतकार आज आपल्यातून निघून गेला आहे. जामखेड येथे झालेल्या कवी संमेलनात संत ज्ञानदेव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. ते गेली अनेक वर्ष माझे मित्र होते. त्यांचे एक वैशिष्ट्य होते की, ते छोट्या संमेलनांसाठी गावांमध्ये जात होते. परंतु त्यांनी कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद स्वीकारले नाही. एक निसर्गाशी नाळ असलेला कवी आज आपल्यातून गेला आहे, अशी भावना कवी फुटाणे यांनी व्यक्त केली.