Poet ND Mahanor Passed Away : वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, रानकवींचे मुलं झाली भावूक - कवी ना धो महानोर
पुणे : ज्येष्ठ कवी ना.धो.महानोर यांचे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी साडेआठ वाजता निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी त्यांची मुलं बाळकृष्ण महानोर आणि सरला महानोर यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. वडिलांची शेवटची इच्छा होती की, त्यांना शेतात जायचे आहे. तिथे थांबायचे आहे. ही पण गेल्या 15 दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास होत होता. आम्ही त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात घेऊन गेलो. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आम्ही त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नसल्याची खंत रानकवीच्या मुलांनी व्यक्त केली.