PM Visits Elephants Camp: तामिळनाडूतील हत्तींच्या छावणीत पोहोचले पीएम मोदी, माहुतांशी केली चर्चा - हत्तीच्या छावणीला पीएम मोदींची भेट
बंगळुरू- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन जंगल सफारीचा आनंद लुटला. 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त ते चामराजनगर येथे पोहोचले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या निलगिरी डोंगरी जिल्ह्यातील मुदुमलाई येथे हत्तींच्या छावणीला भेट दिली. कॅम्पमध्ये हत्तींनीही पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथील व्याघ्र प्रकल्पाच्या छावणीत मोदींनी काही हत्तींना ऊसही दिला. पीएमओनेही ट्विटसोबत फोटो शेअर केला आहे. 1973 मध्ये बांदीपूर नॅशनल पार्कला 'प्रोजेक्ट टायगर' अंतर्गत आणण्यात आले होते. यानंतर काही आरक्षित वनक्षेत्रे अभयारण्यात विलीन करण्यात आली. सध्या बांदीपोरा व्याघ्र प्रकल्प 912.04 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे.
हेही वाचा: ईस्टरनिमित्त पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले आता आपल्याला