PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणारा शिर्डीतील दर्शनरांग प्रकल्प कसा आहे? पाहा व्हिडिओ - PM Modi in shirdi
Published : Oct 26, 2023, 11:16 AM IST
अहमदनगर (शिर्डी) PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 ऑक्टोबर) शिर्डी येथे येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. शिर्डीत येणाऱ्या देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साई संस्थाननं १०९ कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. या दर्शनरांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार आहे. १९ ऑक्टोबर २०१८ रोजी या प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. त्यानंतर आता आज या दर्शनरांग प्रकल्पाचं पंतप्रधान मोदी करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दुसरा शिर्डी दौरा असल्यानं त्यांच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आलीय. तसंच सर्व कामांचे लोकार्पण करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी हे साईमंदिरात जाऊन साई समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर 'शिर्डी माझे पंढरपूर' ही आरतीही त्याच्या हस्ते केली जाईल. आरती झाल्यानंतर साई संस्थानच्या वतीनं मोदींचा सत्कार करण्यात येणार असून साई संस्थाननं तयार केलेल्या 2024 च्या दैनंदिनीचे प्रकाशनही ते करणार आहेत.