महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

PM Narendra Modi रावण म्हणून काँग्रेस नेत्यांनी गुजरातचा अवमान केला.. कमळाचे बटण दाबून त्यांना धडा शिकवा.. मोदी गरजले - Pm Modi On Mallikarjun Kharge

By

Published : Dec 1, 2022, 1:55 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेल्या 'रावण' वरील टीकेला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदी म्हणाले की, मुख्य विरोधी पक्षाचे नेते मला कोण जास्त शिवीगाळ करू शकते हे पाहण्यासाठी स्पर्धा करत आहेत. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत 'जेवढी चिखलफेक कराल, तितकी कमळ फुलणार' असं म्हटलं आहे. खरगे यांच्याआधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मोदींविरोधात टीका केली होती. पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना मोदी म्हणाले की, माझ्या विरोधात वापरलेली अशी अपमानास्पद भाषा गुजरात आणि तेथील जनतेचा अपमान आहे. कारण मी याच भूमीवर वाढलो आहे. विधानसभा निवडणुकीत कमळाचे बटण दाबून काँग्रेस नेत्यांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. अहमदाबादच्या बेहरामपुरा येथे सोमवारी एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना खरगे म्हणाले होते की, पंतप्रधान सर्व निवडणुकांमध्ये 'आपला चेहरा पाहून मतदान करा' असे सांगतात. खरगे यांनी विचारले होते, 'तुम्ही 100 डोकी असलेल्या रावणासारखे आहात का?' Gujarat assembly election 2022, Pm Modi On Mallikarjun Kharge, Pm modi on mallikarjun ravan statement
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details